Saturday, August 16, 2014

Firtya Chakavarati Deshi फिरत्या चाकावरती देशी

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

माती पाणी उजेड वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार


घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार 

तूच घडविशी तूच फोडीशी
कुरवाळीशी तू तूच तोडीशी
न काळे यातून काय जोडीशी
देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अंधार

तू वेडा कुंभार विठ्ठला
तू वेडा कुंभार

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीत / गायक - सुधीर फडके
चित्रपट  - प्रपंच