Friday, June 27, 2014

Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari - भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी

तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी

तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ 

एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली
संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी

तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२  

सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी

तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ 

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ 

(श्रेय मूळ गीतकार, संगीतकार, गायक यांना. नावे माहिती असल्यास सुचवावे)

11 comments:

  1. गायिका या शकुंतला जाधव ,हे गीत सोपान कोकाटे यांनी लिहिले आहे तर संगीत कमलेश जाधव यांचे .

    ReplyDelete
  2. अधिक मराठी अभंग या वेबसाइटवर पहा https://marathigani.in/

    ReplyDelete
  3. Verry nice singing with voice

    ReplyDelete
  4. मला इंटरनेटवर सापडलेली सर्वोत्कृष्ट मराठी गाण्याची वेबसाइट. हिंदी आणि पंजाबी गाण्याच्या बोलांसाठी येथे भेट द्या: https://www.vklyrics.com/

    ReplyDelete
  5. मला इंटरनेटवर सापडलेली सर्वोत्कृष्ट मराठी गाण्याची वेबसाइट. हिंदी आणि पंजाबी गाण्याच्या बोलांसाठी येथे भेट द्या: https://www.vklyrics.com

    ReplyDelete