Wednesday, June 25, 2014

Jevha Tujhya Batanna - Lyrics

जेव्हा तुझ्या बटांना -२
उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना
माझा न राहतो मी -२
हरवून हा किनारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझ्या बटांना

आभाळ भाळ होते -२ , होती बटाही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटाच अंतरीच्या, नाही मुळी निवारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझा बटांना

डोळे मिटून घेतो -२, छळ हा तरी चुकेना -२
ही वेल चांदण्याची -२, ओठावरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या कुशीचा उगवेल सांग तारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना

गीतकार - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - सुधीर फडके 

1 comment:

  1. तिरूपती मंदिरात विट्ठल पांडुरंग, विट्ठल पांडुरंग..-चंद्रभागेतिरी उभा विटेवरी अशा शब्दात एका भजनावर भक्तांचे नृत्य यू ट्यूबवर आहे त्याचे बोल मिळतील का

    ReplyDelete