Sunday, October 26, 2014

Dis Nakalat Jai - Marathi lyrics

दिस नकळत जाई -२
सांज रेंगाळून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२

भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो
वेड सखे साजणी हे -२
मज वेडावून जाई
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२

असा भरून ये उर जसा वळीव भरावा -२
अशी हुरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या -२
मग भिजुनिया जाई
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२

आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा -२
जशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ असे आभाळ -२
रोज पसरून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२

सांज रेंगाळून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२
दिस नकळत जाई
गायक -

Pahile na mi tula tu mala na pahile - lyrics

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला ....

हिमवर्षावातही कांती तव पाहुनी - २
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिम तुषार गालावर थांबले -२
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

पाहिले न मी तुला ....

का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी -२
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदणी
धुंदल्या तुझ्या मिठीत  देहभान हरपले - २
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला ....

मृदुशैया टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूपदे कळी बघून नयन हे सुखावले - २

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला ....

गायक - सुरेश वाडकर