Monday, June 30, 2014

Sang kadhi kalnar tula bhav majhya manaatla

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला  - ती
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला - ती

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला - तो

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

जुळता डोळे एका वेळी - ती
धीट पापणी झुकली खाली - तो
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला - दोघे
 सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - दोघे

गायक / गायिका - महेंद्र कपूर / सुमन कल्याणपूर
गीतकार - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन. दत्ता
चित्रपट - अपराध 

7 comments:

  1. ऐकत राहावंसं वाटत
    जून तेच सोन.बोलतात ना तेच खरं

    ReplyDelete
  2. खुपच सुन्दंर गाण

    ReplyDelete
  3. Radyala bhidnar ek surel gan aikun hot janu kahi Prem Vedya jivac son

    ReplyDelete
  4. Radyala bhidnar ek surel gan aikun hot janu kahi Prem Vedya jivac son

    ReplyDelete
  5. या पेक्षा कोणते अजून सुंदर गाणे असेल असे वाटत नाही
    अप्रतिम
    किती प्रेम भरले आहे त्या गाण्यात

    ReplyDelete