Friday, July 4, 2014

Onkar swarupa sadguru samartha Suresh Wadkar

ओंकार स्वरूपा सदगुरू समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो

नमो मायबापा गुरुकृपा घना
तोडिया बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण निरशील
तुजवीण दयाळा सदगुरू राया

सदगुरू राया माझा आनंद सागर
त्रैलोक्या आधार गुरु राव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र रवी
रवी शशी अग्नी नेण तिज्या रुप
स्वप्रकाश रूपा नेणे वेद

एका जनार्दनी गुरु परब्रह्म
तयाचे पै नाम सदा मुखी

कवी - संत एकनाथ महाराज
गायक - सुरेश वाडकर
संगीत - श्रीधर फडके

9 comments:

  1. its really great lyrics.and music too!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Its really superb, it was very helpful for my practise for 2016 Ganehh Ustav Orchestra....

      Delete
    2. Its really superb, it was very helpful for my practise for 2016 Ganehh Ustav Orchestra....

      Delete
  2. एवढं सुंदर भावगीत, तबल्यावर जो कोणी होता त्याने डोळे मिटून ऐकायला भाग पाडलं.......

    ReplyDelete
  3. खूप सुंदर ......

    ReplyDelete
  4. या स्तोत्राबद्दल लोकांचा गैरसमज आहे कि हे गणपतीचे स्तोत्र आहे. वास्तवात हे स्तोत्र उपनिषदांत वर्णन केलेल्या परब्रह्मा बद्दल आहे आहे.

    ReplyDelete
  5. संत एकनाथ महाराजांनी त्यांचे गुरू श्री जनार्दन स्वामी यांना उद्देशून रचलेला हा अभंग आहे

    ReplyDelete