Friday, November 7, 2014

Shukratara Mand vaara chandane panyatuni

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या -२ मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा  -२

ती -
मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला - २
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला -२
अंतरीचा गंध माझ्या -२ आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा -२

तो -
लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा -२
अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे हि हवा -२
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा - २

ती - 
शोधिले स्वप्नात मी ते परी जागीपणी - २
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी -२ आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा -२


तो - शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी
ती - चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
दोघे - आज तू डोळ्यात माझ्या -२ मिसळूनी डोळे पहा
तो - तू अशी जवळी रहा  ती - तू असा जवळी रहा

गीतकार - मंगेश पाडगावकर
गायक - अरुण दाते, सुधा मल्होत्रा
संगीत - श्रीनिवास खळे

2 comments:

  1. Hey Tuzhi website baghitli. Khup Boring look ahe.
    Mazhi website tuzhya peksha mast ahe.

    https://geet-katta.blogspot.com

    Mla mazhi website vikaychi ahe, pahije asel tr bol.
    Mla contact kru shaktos
    Maza Email - ritu10mali@gmail.com

    Mi 500 Rs la vikel.

    ReplyDelete