Wednesday, October 17, 2012

Aali Aai Bhavani Swapnat

आली आई भवानी सपनात
श्रीवरदा सुप्रसन मूर्ती, जशी वीज चमके गगनात
जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी सपनात
आली आई भवानी सपनात

सरळ भांग नीज भुजंग वेणी, काजळ ल्याली नयनात
रत्नजडीत हार कासे पितांबर
कंचुकी हिरवी अंगात
आली आई भवानी सपनात

केशर कस्तुरी मिश्रीत तांबुल लाल रंगला वदनात
कंकण कनकाची खण
खणती
वाजती पैंजण पायात
आली आई भवानी सपनात

विष्णुदास म्हणे, कशी निरंतर हि आवडे
दे आवडी मज भजनात
आली आई भवानी सपनात
श्रीवरदा सुप्रसन मूर्ती, जशी वीज चमके गगनात
जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी सपनात
आली आई भवानी सपनात

गीतकार - संत विष्णुदास महाराज

Majhi Renuka Mauli

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली
जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

हाके सरशी घाई घाई
वेगे धावतची पाई 
आली तापल्या उन्हात नाही आळस मनात
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

खाली बैस घे आराम
मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली

माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची सावली
कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली


गीतकार - विष्णुदास महाराज 
गायिका - उषा मंगेशकर 


Wednesday, July 14, 2010

Lallati Bhandar

लल्लाटी भंडार

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगर माथ्याला देवीचं मंदिर 
घालू जागर जागर डोंगर माथ्याला
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येन्गुन उघड देवी दार

नदीच्या पाण्यावर आगीन फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत 
नाद आला ग आला ग जीवाच्या घुन्गराला
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार 
आलो दुरून रंगून डोंगर येण्गुन उघड देवी दर

कोरस - नवसाला पाव तू देवी माझ्या हाकला  धाव तू
हाकला धाव तू देवी माझ्या अंतरी रहाव तू
देवी माझ्या अंतरी हराव तू काम क्रोध परतुनी लाव तू 
काम क्रोध परतुनी लाव तू देवी माझी हाकला धाव तू 

डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुग्र्या वाहीन
घुग्र्या वाहीन तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
लल्लाटी भंडार .....

कोरस - यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर 
दिवसाची भाकर दाविती हि दमल्या ग लेकरा
हे पुनावाचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझ्या मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर 

खणा नारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन तुझी सेवा करीन
सेवा करीन तुझा  देवारा धरीन
देवारा धरीन माझी ओंजळ वहिन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला

लल्लाटी भंडार...

कोरस - यल्लम्मा देवीचा जागर ह्यो ....

गीतकार - संजय कृष्णाजी पाटील
संगीत - अजय-अतुल 
गायक - अजय गोगावले व कोरस
चित्रपट - जोगवा 

Khel Mandala


खेळ मांडला 


तुझ्या पायरीशी कुणी सान थोर न्हाई,
साद सुन्या काळजाची तुज्या कानी जाई
हे... तरी देवा सरना ह्यो भोग कशापाई,
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,
वोवाळूनी उधळतो जीव मायबापा,
वानवा ह्यो उरी पेटला
खेळ मांडला 

हे.... उसवलं गणगोत सारं, 
आधार कुणाचा न्हाई,
भेगाळल्या भुइपरि जीणं, 
अंगार जीवाला जाळी, 
बळ दे झुंजायला कीर्तीची ढाल दे, 
इनविती पंचप्राण जीव्हाऱ्यात ताल दे, 
करपल रान देवा जळल शिवार,
तरी न्हाई धीर सांडला,
खेळ मांडला 

गीतकार - गुरु ठाकुर 
संगीत - अजय-अतुल
गायक - अजय गोगावले
चित्रपट - नटरंग (२०१०)


See the Video Song - Khel Mandala, Natrang

Namaskar !!

नमस्कार,
मराठीत आजवर अनेक अजरामर गाण्यांची निर्मिती झाली आहे. श्रवणीय संगीताबरोबरच हृदयाला भिडनारे बोल हे मराठी गाण्यांचे वैशिष्ट्य. अशाच सर्व स्मरणीय गाण्यांचे बोल तुम्हाला या ब्लॉग मधे वाचायला मिळतील. तेव्हा आपल्या आवडत्या गीतांचा संग्रह असलेल्या या ब्लॉग ला नेहमी भेट द्या. खास तुमच्या साठी हा ब्लॉग रोज अपडेट केला जाईल. 
आपल्या आवडीचे एखादे गाणे हवे असल्यास कॉमेंट मध्ये ते जरूर कळवा. गीताच्या बोलाबरोबरच सदर गीताचे गीतकार, संगीतकार, गायक कोण आहेत याचीही माहिती दिली जाईल. 
कृपया हा ब्लॉग अधिक उपयुक्त करण्यासाठी आपल्या सूचना जरूर कळवा.