Friday, July 4, 2014

Kuthe shodhisi Rameshwar kuthe shodhisi Kashi

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेवून नांगर हाती पिकाविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उंच पिकातून
कधी होवुनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी 
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी 
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

गीतकार -मंगेश पाडगावकर
गायक - सुधीर फडके
संगीत - यशवंत देव

Wednesday, July 2, 2014

He Hindu nrusinha prabho Shivaji raja

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

करी हिंदूराष्ट्र हे तुते, वंदना
करी अंतःकरणज तुज, अभिनंदना
तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना
गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो ज्या

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

ही शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पाच शाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कुटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहु दे
ती बुद्धी भाबड्या जीव लाभू दे
ती शक्ती श्रोणीतामाजी वाहु दे 

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा 
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

कवी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 
गायिका -लता मंगेशकर / कोरस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

Savale sundar rup manohar

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
सावळे सुंदर रूप मनोहर

आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड
तुझे नाम गोड पांडुरंगा
सावळे सुंदर रूप मनोहर

जन्मो जन्मी ऐसे मागितले तुज
आम्हासी सहज द्यावे आता
सावळे सुंदर रूप मनोहर

तुका म्हणे तुज असे दयाल
धुंडिता सकळ नाही आम्हा
सावळे सुंदर रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे
सावळे सुंदर रूप मनोहर

अभंग - संत तुकाराम महाराज
गायक - मा. पं. भीमसेन जोशी 

Tuesday, July 1, 2014

Abir gulal udhalit rang natha ghari nache majha sakha Pandurang

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग

उंबरठ्यासी  कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
अबीर गुलाल उधळीत रंग 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी

Bolava Vitthal pahava Vitthal

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बंधनापासुनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव


तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर 
 

Monday, June 30, 2014

Sang kadhi kalnar tula bhav majhya manaatla

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला  - ती
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला - ती

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला - तो

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

जुळता डोळे एका वेळी - ती
धीट पापणी झुकली खाली - तो
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला - दोघे
 सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - दोघे

गायक / गायिका - महेंद्र कपूर / सुमन कल्याणपूर
गीतकार - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन. दत्ता
चित्रपट - अपराध 

Sur tech chedita

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे

 सूर तेच छेडीता गीत उमटले नवे

एकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती शब्द शब्द आठवे

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
सूर तेच छेडीता......

गीतकार - मधुसूदन कालेलकर 
गायक - महेंद्र कपूर