Saturday, August 16, 2014

Firtya Chakavarati Deshi फिरत्या चाकावरती देशी

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

माती पाणी उजेड वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार


घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार 

तूच घडविशी तूच फोडीशी
कुरवाळीशी तू तूच तोडीशी
न काळे यातून काय जोडीशी
देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अंधार

तू वेडा कुंभार विठ्ठला
तू वेडा कुंभार

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीत / गायक - सुधीर फडके
चित्रपट  - प्रपंच 


Friday, July 18, 2014

He jeevan sundar aahe

हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे

नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी

इथ इमारतीच्या जंगलांचा वनवास
त्यातून दिसणार टीचभर आकाश
आणि गर्दीत घुस्मटलेले रस्त्यांचे श्वास


कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे

पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची 


इथ गाणं लोकलचं पाणी तुंबलेल्या नळाचं
आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं 

इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे

गीतकार -  सुधीर मोघे
गायिका / गायक - आशा भोसले / ?
संगीत -आनंद मोडक
चित्रपट - चौकट राजा 

Saturday, July 5, 2014

Ek jhoka chuke kalajacha thoka ek zoka

एक झोका एक झोका
चुके काळजाचा ठोका
एक झोका

उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतः लाच फेका
एक झोका एक झोका

नाही कुठे थांबायचे
मागे पुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका
एक झोका एक झोका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे
खूप मजा थोडा धोका
एक झोका एक झोका

गीतकार - सुधीर मोघे 
गायिका - आशा भोसले
संगीत - आनंद मोडक
चित्रपट - चौकट राजा

Friday, July 4, 2014

Onkar swarupa sadguru samartha Suresh Wadkar

ओंकार स्वरूपा सदगुरू समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो

नमो मायबापा गुरुकृपा घना
तोडिया बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण निरशील
तुजवीण दयाळा सदगुरू राया

सदगुरू राया माझा आनंद सागर
त्रैलोक्या आधार गुरु राव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र रवी
रवी शशी अग्नी नेण तिज्या रुप
स्वप्रकाश रूपा नेणे वेद

एका जनार्दनी गुरु परब्रह्म
तयाचे पै नाम सदा मुखी

कवी - संत एकनाथ महाराज
गायक - सुरेश वाडकर
संगीत - श्रीधर फडके

Pandhari nivasa sakhya panduranga

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
करी अंगसंगा भक्ताचिया
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

भक्त कैवारिया होसी नारायण
बोलता वचन काय लाज 
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

मागे बहुतांचे फेडीयले ऋण
आम्हासाठी कोण आली धाड
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

वारंवार तुज लाज नाही देवा
बोल रे केशवा म्हणे नामा
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

करी अंगसंगा भक्ताचिया
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

अभंग - संत नामदेव
गायक - पं. भीमसेन जोशी

Dharila pandharicha chor - Pandharichi Vaari

धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर

हृदयबंदी खाना केला 
आत विठ्ठल क्वान्डीला (कोंडीला)
शक्ती केली दडादुडी
विठ्ठल पायी घातली बेडी
धरिला पंढरीचा चोर


शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुळतीला आला
जनी म्हणे बा विठ्ठला
जीवे न सोडी मी रे तुला
धरिला पंढरीचा चोर

गळा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर

गीत - संत जनाबाई
गायिका - अनुराधा पौडवाल
संगीत - विश्वनाथ मोरे
चित्रपट - पंढरीची वारी 

Vitthalachya payi veet jhali bhagyawant

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत 
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहुनिया पुंडलिकाची सेवा ती अलोट
फेकताच वीट घडली परब्रह्म भेट
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पहाताच होती दंग आज सर्व संत 
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

कवी - दत्ता पाटील
गायक - प्रल्हाद शिंदे
संगीत - ??