Friday, June 27, 2014

Pandharicha Vitthal Kuni Pahila, Ubha kasa rahila vitevari - पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला

विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे विठ्ठल कितीसे दूर
इमानदारांच्या समीप अन बैमानापासून दूर

उभा कसा राहिला विटेवरी
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी

अंगी शोभे पितांबर पिवळा
गळ्यामध्ये वैजयंती माळा 
चंदनाचा टीळा माथी शोभला -२
उभा कसा राहिला विटेवरी

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी

चला चला पंढरीला जाऊ
डोळे भरुनी विठू माउलीला पाहू
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला -२
उभा कसा राहिला विटेवरी

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला 
उभा कसा राहिला विटेवरी

ठेवूनिया दोन्ही कर कटी
उभा हा मुकुंद वाळवंटी
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला
उभा कसा राहिला विटेवरी

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला 
उभा कसा राहिला विटेवरी

बाळ श्रावण प्रार्थी आता
नका दूर लोटू पंढरीनाथ
तव चरणी हा देह सारा वाहिला
उभा कसा राहिला विटेवरी

पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला 
उभा कसा राहिला विटेवरी

सर्व श्रेय मूळ गीतकार यांना गीतकार - ??

Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माउली तू माउली जगाची

विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

काय तुझी माया सांगू श्रीरंगा -२
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

लेकरांची सेवा केलीस तू आई-२
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू -४
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची

गीतकार - विठ्ठल वाघ 
गायक - सुधीर फडके / सुरेश वाडकर / जयवंत कुलकर्णी
संगीत - अनिल - अरुण

Chandrabhagechya Tiri - lyrics चंद्रभागेच्या तिरी

पुंडलिका वर दे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

चंद्रभागेच्या तिरी-२ उभा मंदिरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२
दुमदुमली पंढरी-२ पांडुरंग हरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२

जगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुनी सेवा खरी -२ थांबला हरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२

नामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला - २
टाळ घेवूनी करी -२ चला वारकरी तो पहा विटेवरी 
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२

संत जनाई ओवी गाई
विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२
तशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२

रखुमाई मंदिरी-२ एकली परी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२

संत जणांची गायिली गाथा विठ्ठल चरणी ठेवुनी माथा
गुरुकृपा ती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी
 विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२

गीतकार - दत्ता पाटील 
गायिका - अनुराधा पौडवाल / कोरस
संगीत - ?? 

Abhas haa song lyrics आभास हा - यंदा कर्तव्य आहे

कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा / कशी सावरू मी आवरू ग/रे मी स्वतः
दिसे स्वप्न  का हे जागतानाही मला                       - तो / ती
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला      - ती / तो
आभास हा ...

क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती     - तो

मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याचसाठी सजते          - ती

तू नसताना असल्याचा खेळ हा                                   - तो
दिसे स्वप्न का हे जागतानाही ही मला ..                    - ती


आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला     
आभास हा ... आभास हा ...                                        - तो 

मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस तू खरा कसा रे    - ती

तू इथेच बस ना हळूच हस ना अशीच हवी मला तू
पण माहित नाही मलाही अजुनी अशीच आहेस का तू         - तो

नवे रंग सारे नवी वाटे हि हवा                                            - ती  
दिसे  स्वप्न का हे जागतानाही मला                               - तो

आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला     
आभास हा ... आभास हा ...                                        - तो 

कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे हि आस लागे जीव
कशी सावरू मी आवरू ग मी स्वतः
दिसे स्वप्ना का हे जगतानाही मला
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा ...

(हे द्वंद्व गीत आहे त्यामुळे तो / ती लिहिले आहे)
गीतकार - अश्विनी शेंडे 
गायक / गायिका - राहुल वैद्य / वैशाली सामंत
संगीत - निलेश मोहरीर

Kadhi tu .. Mumbai Pune Mumbai lyrics कधी तू

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात
कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात ...
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ....

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात

कधी तू अंग अंग मोहरणारी 
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात ...
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ....

जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात

गीतकार - श्रीरंग गोडबोले
संगीत  - अविनाश - विश्वजीत
गायक - ह्रीशिकेश रानडे
चित्रपट - मुंबई पुणे मुंबई 

Wednesday, June 25, 2014

Jevha Tujhya Batanna - Lyrics

जेव्हा तुझ्या बटांना -२
उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना
माझा न राहतो मी -२
हरवून हा किनारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझ्या बटांना

आभाळ भाळ होते -२ , होती बटाही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटाच अंतरीच्या, नाही मुळी निवारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
जेव्हा तुझा बटांना

डोळे मिटून घेतो -२, छळ हा तरी चुकेना -२
ही वेल चांदण्याची -२, ओठावरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या कुशीचा उगवेल सांग तारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
जेव्हा तुझा बटांना

गीतकार - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - सुधीर फडके 

Tujhe Rup Chitti Raho

तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो.....

देह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म,
सदाचार नीतीहुनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे, हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

तुझे नाम पांडुरंग सर्वताप नाशी, 
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी 
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
देह प्रपंचाचा दास,  सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणुनी आठ याम

देह प्रपंचाचा दास,  सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम


पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...
पांडुरंग जी पंदुरंजा पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग 

 गीतकार - संत गोराकुंभार
संगीत - सुधीरफडके
गायक - सुधीर फडके