Tuesday, July 1, 2014

Abir gulal udhalit rang natha ghari nache majha sakha Pandurang

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग

उंबरठ्यासी  कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
अबीर गुलाल उधळीत रंग 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी

Bolava Vitthal pahava Vitthal

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बंधनापासुनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव


तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर 
 

Monday, June 30, 2014

Sang kadhi kalnar tula bhav majhya manaatla

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला  - ती
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला - ती

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला - तो

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - तो

जुळता डोळे एका वेळी - ती
धीट पापणी झुकली खाली - तो
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला - दोघे
 सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला  - दोघे

गायक / गायिका - महेंद्र कपूर / सुमन कल्याणपूर
गीतकार - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन. दत्ता
चित्रपट - अपराध 

Sur tech chedita

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे

 सूर तेच छेडीता गीत उमटले नवे

एकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती शब्द शब्द आठवे

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
सूर तेच छेडीता......

गीतकार - मधुसूदन कालेलकर 
गायक - महेंद्र कपूर
 

Nighalo gheun dattachi palakhi

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  -२

निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  -२

रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळूक कोवळी चंदनासारखी
निघालो घेवून दत्ताची पालखी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  -२

सात जन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांतमाया मूर्ती पहाटे सारखी
निघालो घेवून दत्ताची पालखी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  -२

वाट वळणाची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियात गंगा जाहली बोलकी
निघालो घेवून दत्ताची पालखी

निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  -२

गायक - अजित कडकडे
संगीत - प्रवीण दवणे
गीतकार - ?? 
 

Sunday, June 29, 2014

Hirva Nirsarg - Navra majha navsacha

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे धुन्द व्हा रे 


नवे पंख पसरा उंच उंच लहरा 
भिरभिरणारे गीत गा रे
गीत गा रे धुंद व्हा रे 

झु झु झु झु झु झु झु झु झु झु झु झु

गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी  अशी चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नाश आज आली
सडा शिंपीला हा जणू प्रीतीने

रु रु रु रु रु रु रु रु रु रु .....

नव्या संगीतातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
जन्म हे जगावे विश्व हे बघावे
एकरूप व्हावे संग साथीने

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे धुन्द व्हा रे

गायक - सोनू निगम
संगीत  - ??
गीत - जगदीश खेबुडकर


Man udhan varyache

मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते 
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधान वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वाऱ्याचे

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते बावरते घडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते 
मन उधान वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वाऱ्याचे

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागून पळते
मन उधान वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वाऱ्याचे


गायक - शंकरमहादेवन
संगीत - अजय - अतुल